शिरुर - बाबूराव दौंडकर स्मारक समिती रांजणगाव (गणपती) येथील नवीन संकुलाचे उदघाटन व वेबसाईटचे लोकार्पण गुरुवार दि . २१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य व्ही .भागय्याजी यांचा हस्ते होणार असून यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघसंचालक नानासाहेब जाधव उपस्थित राहणार असल्याची माहिती बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेस समितीचे उपाध्यक्ष - धनंजय गायकवाड, कोषाध्यक्ष - सागर फराटे, विठ्ठल वाघ, नानासाहेब लांडे आदी यावेळी उपस्थित होते. ॲड. खांडरे म्हणाले की शिरुर तालुक्यास सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न स्वर्गीय आमदार बाबूराव दौंडकर यांनी केला. सन १९७२ दुष्काळी तालुक्याची दुष्काळ परीषदेचे आयोजन करण्यात त्यांच्या पुढाकार होता. तसेच जनतेचा प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व सर्वाना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक रांजणगाव येथे उभारले गेले. बाबुराव दौंडकर स्मारक समिती मागील २५ वर्षे ग्राम विकास व कृषि विकासाचे कार्य करीत आहे. या स्मारक समितीची एक एकराची जमिन रांजणगाव (गणपती) येथे असून स्थानिक शेतक-यांसाठी हक्कांचे सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र याठिकाणी व्हावे, या दृष्टीने स्मारक समिती काम करते. शेतक-यांसाठी पाणी माती परीक्षण केंद्र, शेतीविषयक मार्गदर्शक कार्यक्रम, मेळावे, मार्गदर्शन, परिसंवाद, प्रयोग प्रात्यक्षिके, कृषी ग्रंथालय, प्रशिक्षण हॉल, गोवंश संवर्धन, आरोग्य विषयक मार्गदर्शन, कुटुंब सल्ला मार्गदर्शन केंद्र, स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण, सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र, आजारी जनावरांच्या उपचारासाठी फिरते वाहन आदी उपक्रम स्मारक समितीच्या मार्फत केले जातात असे ही ॲड. खांडरे यांनी सांगितले.
बाबुराव दौंडकर स्मारक समिती यांच्या वतीने धामारी ता. शिरूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि शेती ओलिताखाली येण्यासाठी तेथे ओढ्यावर बंधारा बांधण्यात येणार असून सदर कामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
धामारी ता. शिरूर येथील ओढ्यावर जलदुत प्रकल्प अंतर्गत सेवावर्धिनी ॲटलास कॅपको कंपनी व बाबुराव दौंडकर स्मारक समिती यांच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्रजी खांडरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीधरपंत गायकवाड, सुर्यकांत शिर्के सर, प्रभाकर मुसळे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, उद्योजक दिलीप हिंगे, संतोष करपे, नारायण शिंदे , तानाजी राऊत, विठ्ठल वाघ, जयेश भुजबळ, समाधान दांडगे समन्वयक, यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये अशा पध्दतीने बंधारे झाल्यास शेतीसाठी मोठ्या फायदा होत असल्याने प्रत्येक ठिकाणी असे बंधारे करणे गरजेचे असल्याचे मत सुर्यकांत शिर्के सर यांनी व्यक्त केले.
बाबुराव दौंडकर स्मारक समिती यांच्या वतीने कासारी गाव येथे कार्यकर्ता प्रशिक्षण, भूमी सुपोषण उपक्रम संपन्न झाला. शिरूर तालुक्यातील १३ गावातील ४८ शेतकरी उपस्थित होते. शेतकरी यांच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करीत असते. त्या अंतर्गत २०२२ या वर्षात रासायनिक खते, किटकनाशके यामुळे शेतीला – मातीला अवकळा आली. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होऊन खर्च वाढला आहे. अन्नधान्य, भाज्या, फळे यात विषारी अंश उतरुन अनेक आजार उद्भभवत आहेत. यावर उपाय म्हणून गाजियाबाद (उत्तरप्रदेश) येथील शास्रज्ञ श्री. किशन चंद्रा यांनी देशी गाईच्या शेणातील जीवाणू पासून वेस्ट डी कंपोझर बनवले आहे. शासकिय प्रयोग शाळेत बनवलेल्या या कल्चर (विरजन) ची किमत फक्त रु. 20/- आहे. विरजण लाऊन दही बनवतात तसे हे कल्चर वापरून आपण वेस्ट डी कंपोझर करू शकतो. वेस्ट डी कंपोझर बनवण्याची कृती अत्यत सोपी कमी खर्चाची व अतिशय लाभदायक आहे.
प्रत्येकी २०० लिटर पाण्यासाठी २ किलो काळा, खराब किंवा कसलाही गूळ. २. 20 लिटर क्षमतेचे एक क्यान, ३. २०० लिटर क्षमतेचे प्लास्टिक बँरल
प्लास्टिक बँरल मध्ये १८० लिटर पाणी घेऊन त्यात २ किलो काळा गूळ / सेंद्रिय गूळ बारीक करून टाका. आणलेले 20 लिटर कल्चर (विरजण) त्यात टाका व झाकुन ठेऊन द्या. उन्हाळ्यात ५ दिवस व हिवाळ्यात 8 दिवस हे मिश्रण सकाळ व संध्याकाळ काठीने वर्तूळाकार ढवळा ह्या मिश्रणाला आंबट वास येईल. तुमचे मिश्रण वापरण्यास तयार झाले.
जमिनीत जीवाणूची वाढ झपाट्याने होते. जमीन भूसबुशीत होते. जमिनीतील काडी कचरा, पालापाचोळा लवकर कुजण्याची क्रिया होऊन चांगले खत तयार होते. जमिनीतील सेंद्रिय कार्बान हळूहळू वाढत जाऊन जमीन सकस होते. ही एक निरंतर क्रीया असून आपल्या जमिनीचे आपण सुपोसण चांगल्याप्रकारे करू शकतो. त्या जमिनीला सजीव करू असा संकल्प करूया. कार्यकर्ता प्रशिक्षण भूमी सुपोषण उपक्रम संपन्न झाला. अनेक शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील सुमारे ४८ शेतकऱ्यांना संद्रीय शेती करण्याचा संकल्प केला. सर्व ठिकाणच्या कार्यक्रमाचे नियोजन नारायण शिंदे, विठल वाघ, गणेश देशमुख, दतात्रेय दरेकर, तानाजी राऊत, समाधान दांडगे, जयेश भुजबळ यांनी परिश्रम घेऊन केले. भारतीय किसान संघ शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते श्री. शिर्के संरानी पुढाकार घेतला. भारतीय किसान संघाचे संभाजी पानसरे यांनी उद्घाटन केले. संभाजी पानसरे यांनी मूर्तीला पुष्पाहार घातला. प्रास्तावीक व सूत्रसंचालन शिर्के संरानी केले. आभार प्रदर्शन नारायण शिंदेसरांनी केले.
सेंद्रिय शेती हीच आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ डॉ. व्ही. एस. राव यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे स्व. बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्यावतीने आमदार स्व. बाबुराव दौंडकर यांच्या ३५ व्या स्मृतिदिन व कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकरी व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. राव बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात, माननीय पुणे विभाग संघचालक संभाजी आप्पा गवारे, उद्योजक मानसिंग पाचुंदकर, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, मदनदादा फराटे, मुकुंदराव कुलकर्णी उपस्थित होते. सेंद्रिय उत्पादनांच्या विविध स्टॉलचे उद्घाटन करताना माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, चंद्रकांत वारघडे, रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, संस्थेचे सचिव अविनाश भेगडे, विठ्ठल वाघ आदी उपस्थित होते.
आरोग्यदायी व सुखकारक राहावे असे वाटत असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय तरुणोपाय नाही असेही राव यांनी सांगितले. यावेळी बाबुराव दौंडकर स्मारक समितीसाठी ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले अशा ज्येष्ठ मान्यवरांचा कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.
रांजणगावात आंबा लागवडीवर मार्गदर्शन रांजणगाव गणपती, दि. ३ (वार्ताहर) - हरीतक्रांतीनंतर भारत देशात उत्पादन वाढले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी कृषीमंत्री, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
रांजणगाव येथील बाबुराव दौंडकर स्मारक समिती व कृषी विभागातर्फे आयोजित आंबा लागवड व निगा मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ व आंबातज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, ग्राहक पंचायतीचे प्रांत प्रदेशाध्यक्ष धनंजय गायकवाड, बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र खांडरे, संभाजी गवारे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके, राजेश लांडे, विठ्ठल वाघ, तान्हाजी राऊत, डॉ. राजेंद्र ढमढेरे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे उपस्थित होते.
शिरूरसारख्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढणाऱ्या माजी आमदार कै. बाबूराव दौंडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण भूमिपूजन रविवारी (ता. २६) रांजणगाव येथे दुपारी तीन वाजता भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते, तर सेवागढीचे भूमिपूजन राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सहसंघचालक सुरेश जाधव, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अशोक पवार, चंद्रकांत पाटील, भगवानराव साळुंखे, रांजणगावच्या सरपंच सुषमा शेळके, मानसिंग पाचुंदकर, बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. मदन फराटे, बिंदुमाधव जोशी उपस्थित राहणार आहेत. बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून माती- पाणी परीक्षण प्रयोगशाळा, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सेंद्रिय शेतीमालासाठी कायम स्वरूपी प्रदर्शन व विक्री केंद्र, बियाणे पेढी, बाजारभाव केंद्र, गोवंश संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे.
सेवावर्धिनी तर्फे जलदूत दोन या प्रकल्पाचा समारोप आज यशदा येथे होता. त्याप्रसंगी माननीय कळमकर सर (माजी कुलगुरू पुणे विद्यापीठ) माननीय कलशेट्टी सर (डायरेक्टर - यशदा) त्याचबरोबर गायकवाड साहेब ॲटलास कॅपको चे डायरेक्टर व इतर मान्यवर उपस्थित होते. जलदूत म्हणून तानाजी राऊत व गायकवाड सर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला धर्मेंद्रजी खांडरे, नारायण शिंदे, दत्तात्रेय दरेकर, तानाजी राऊत, गायकवाड सर व गोपीचंद राऊत उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या पशुधन आणि डेअरी विभागातर्फे पुण्यात एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट कॉनक्लेव २०२५ मध्ये सहभाग घेण्यात आला. या परिषदेला संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री मा. श्री लल्लन सिंह आणि राज्यमंत्री मा. श्री बधेल साहेब उपस्थित होते.परिषदेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय, त्याचे मार्केटिंग आणि अर्थसहाय्य यावर विस्तृत चर्चा झाली. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम, मदत योजनांबाबत माहिती दिली गेली. शेतीपूरक व्यवसायांना अधिक चालना देण्यासाठी आणि बाजारपेठ निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार मांडण्यात आला.
तीन दिवस गिरच्या जंगलात फिरून गोआधारित शेती, गीर गाईंचे संगोपन, त्यांचे प्रकार आणि गोमय पदार्थ बनविणारे शेतकरी यांची सखोल माहिती घेण्यात आली. यावेळी गीर गाईंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले.गिर गाईंच्या जाती, त्यांचे संगोपन आणि गोमय पदार्थ तयार करणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या समस्या व संधी यावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गीर गाईंच्या संवर्धनातून होणाऱ्या फायद्यांवर भर देण्यात आला.
हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेस ( National Institute of Agriculture Extension Management) MANAGE भेट देऊन डॅा.अे. एस. चार्युलु, डेप्युटी डायरेक्टर यांचेशी चर्चा करुन समिती आणि मॅनेज यांच्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्याची चर्चा झाली.