संस्थेची स्वतःच्या मालकीची एक एकर जागा रांजणगाव गणपती गावाच्या शिवारात पुणे-नगर रस्त्याला लागून आहे. रांजणगाव गणपतीचे मूळस्थानही याच जागेत आहे. या पाश्वभूमीवर हे स्थान परिसरातील शेतक-यांसाठी हक्काचे सल्ला मार्गदर्शन केंद्र व्हावे, अशी समितीची कल्पना आहे.
सहिवाल या गायीचा सहिवाल या प्रांतातून उगम झाला आहे. सध्या हा प्रांत पाकिस्तान मध्ये आहे. सहिवाल ही गाय उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड व हरियानाच्या काही भागात आढळते. तसेच मथुरेपासून ते उत्तरेकडे मेरठ पर्यंत व खाली कनोज पर्यंत सहिवाल गाई आढळतात. सहिवाल ही गाय रंगाने लाल असते तसेच तिचे पाय अतिशय मजबूत असतात. शिंगे ही आकाराने छोटी असतात. त्यांचा खांदा म्हणजे वशिंड हे मध्यम आकाराचे असते. ही गाय उंचीला साधारणपणे साडेतीन ते ४ फुट असते. तसेच लांबी ५ फुटांबर्यंत असते. सहिवाल ही गाय नऊ महिन्यापर्यंत दुध देते म्हणून तिला नऊमासरी म्हणतात. ही गाई चांगल्या ब्रीडची असून आठ गोत्राची आहे. सहिवाल गाई पहिल्या वेताला एका सांजेला ६ लीटर ते ८ लीटर दूध देते. ही गाय थंड वातावरणातील आहे. तरी देखील या गायी महाराष्ट्रातील वातावरणाशी बऱ्यापैकी समरस होताना आढळतात. सध्या संकरित गाईंच्या वाढत्या संख्येमुळे सहिवाल गाई नासवल्या गेल्या आहेत.
दूसरी सगळ्यात महत्वाची आणि भारतभर चर्चेत असणारी
देशी गाय म्हणजे गीर गाय होय. ही गाय गुजरात राज्यामध्ये प्रामुख्याने
पहायला मिळते. तसेच जुनागड जिल्ह्यातील गीरनार पर्वतापासून सुरु
होणाऱ्या गीर या प्रांतापासून भावनगर अमेरेली ते सोमनाथ पर्यंत
चांगल्या जातीच्या गीर गाय आपल्याला पहायला मिळतात. मुख्यतः जुनागड
जिल्ह्यातील सासण, विसावदार, तलाला, मेहंदरडा या गीरच्या जंगलातील
तालुक्यामध्ये सध्या या गायी आढळतात.
हिरण्य नदी ही गीरच्या जंगलातून वाहते. शेतीचा आजुबाजुचा परिसर हा
सुपीक आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी सधन व संपन्न आहेत. त्यांनी या
गीर गाईंची चांगल्या प्रकारे जोपासना केलेली आढळते. गीर गाईमध्ये विविध
प्रकार आढळतात. लाल रंगाची, खालून वर गोल आकाराची शिंगे, उंच खांदा
म्हणजे वशिंड, तसेच उंचवट्याप्रमाणे डोक्याचा भाग, कान फारच मोठे
म्हणजे एकमेकांना लागणारे, डोळे शक्यतो वर काळे व झाकलेले असतात. या
गाई साधारणतः उंचीला साडेचार ते ५ फुट व लांबीला साडेपाच फुटांपर्यंत
असतात. या गाई चांगल्या गोत्राच्या असून पहिल्या वेतास एका सांजेला ६
ते ८ लीटर दुध देतात. गीर मध्ये सोनकपिला म्हणजे सुवर्ण रंगाची तसेच
लीलडी म्हणजे पांढरी आणि काळे टिपके असणारी व काबरी म्हणजे लाल-पांढरे
टिपके असणारी गाय होय. माकडी म्हणजे भुरकट लाल रंगाची गीर गाय होय.
तसेच या गाईचे दुध खुप घट्ट असते. प्रत्येक गाईची वैशिष्ठ्ये ही
वेगवेगळी असतात.
गीर गाय ही नऊ मासी म्हणजे ९ महिने दुध देणारी असते. गीर सारख्या
दिसणाऱ्या लाल रेंदी गाईलाच आपल्याकडे गीर म्हणतात. या रेंदी गाई
सौराष्ट्रातच आढळतात.
राठी
किंवा राठ ही गाय शुद्ध भारतीय प्राचीन गोवंश असून प्रामुख्याने
राजस्थान येथील बिकानेरच्या १०० किमीच्या रखरखीत परिघ परिसरात
आढळतात. बहुतेक ठिकाणी राठी आणि राठ असे उपप्रकार सापडतात. रठ
नावाच्या खेडूत जमातीवरुन या गाईला राठी किंवा रठ असे नाव पडले
आहे. या गाई मुख्यत्वे रंगाने लाल व पांढऱ्या टिपक्यांच्या असतात.
या गाई अतिशय काटक असतात.
भारतातील सर्व गाईंमध्ये या गाईंची रोगप्रतिकारक शक्ती जास्त
असते. या गाईचे मागचे पाय उंच असतात. ही गाय साधारणपणे ७ महिने दुध
देते तसेच एका सांजेला १० लीटर पर्यंत ही गाई दुध देते. या गाईच्या
दुधाची गुणवत्ता सुद्धा उत्तम असते. महाराष्ट्रात मराठवाडा,
अहमदनगर व विदर्भ या भागामध्ये या गाई चांगल्या प्रकारे राहू
शकतात. या गाईंचे क्रॉस ब्रिडींग हे सगळ्यात उत्कृष्ट होते.
कांकरेज गाय कांकरेज
गाय ही एक भारतीय गोवंश असून गुजरात मधील कच्छचे रण तसेच सौराष्ट्र या
ठिकाणी आढळणारी दुसरी प्रसिद्ध गाय होय. ही गाय तलवर, वाघियाड व वाघड
या नावाने सुद्धा ओळखली जाते. या गाई उंचीने धिप्पाड असतात. या गाई एका
सांजेला ५ लीटर दूध देतात. तसेच साधारणतः ६ ते ७ महिने दूध देतात. या
गाईचे वळू गुजरातमधे मुख्यतः शेतीसाठी वापरले जातात.
या गाई उष्णकटिबंधीय तसेच अर्धउष्णकटिबंधीय भागात जास्त आढळतात. या गाई
चांगल्या उष्ण हवामानाचा सामना करु शकतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे
रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. या गाईंची शिंगे ही मोठी असतात.
धारपरकर गाय ही भारतीय गोवंश आहे. गाईंच्या जातीत आणखी एक सुंदर दिसणारी गाय म्हणजे धारपरकर गाय होय. धारपरकर या जिल्ह्याच्या नावावरुन या गाईला हे नाव पडले आहे. आत्ता हा भाग पाकिस्तान मध्ये आहे. या गाईला धार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर या गाई पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश व उत्तराखंडच्या काही भागात आढळतात. धारपरकर ही जात भारतात फारच कमी प्रमाणात सापडते. या गाईचे दुध फार उत्तम असते. तसेच त्यांच्या दुधाची गुणवत्ता देखील चांगली असते. ही गाय ९ मासी असते. एका सांजेला ९६ लीटर पर्यंत या गाई दुध देतात. जास्त उष्ण प्रदेशामध्ये या गाई कमी दुध देतात.
लाल सिंधी गाय ही मुळची पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील असून ही भारत, बांग्लादेश तसेच श्रीलंका येथे आढळते. या गाईचा रंग गडद लालसर, तपकिरी ते पिवळसर लाल रंगाचा असतो. रंग आणि देखावा यामध्ये या गाई खुपच गोलाकार असतात. तसेच शिंग काळीभोर, लहान व वक्र असतात. त्याचबरोबर पाय हे आकाराने लहान व शेपटी लांब असते. उंचीच्या मानाने या गाई मध्यम असतात. या गाई एका सांजेला ४ ते ६ लीटर पर्यंत दूध देतात. क्रॉस ब्रिडींगसाठी या गाईंचा जास्त वापर केला जातो.
भारतीय गोवंश - गाय
भारतीय गाईंची वैशिष्ठ्ये अतिशय उच्च दर्जाची आहेत. भारतीय गाईंचे दुध
म्हणजे पूर्ण अन्न होय. वैज्ञानिकदृष्ट्या गाईचे दुध म्हणजे A2 दुध आणि
संकरित गाईचे दुध म्हणजे A1 प्रकारचे दूध. याचा अर्थ असा की A2
प्रकारच्या दुधामध्ये औषधी गुण जास्त आढळतात. देशी गाईच्या तुपाला
आयुर्वेदात खुप महत्वाचे स्थान आहे. तसेच अनेक रोगांवर गुणकारी असे
मानले जाते. देशी गाईचे शेण व गोमुत्र शेतीसाठी एक प्रकारचे अमृतच
असते.
गाईच्या शेणापासून सडा-सारवण करणे म्हणजे सर्व रोगांपासून संरक्षण करणे
असते हे बाहेरच्या इतर देशांमध्ये विविध प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे.
गारतीय गोवंश हे संपुर्ण जगात महत्वाचे मानले जाते. त्याचा विस्तार हा
आशिया खंडापासून ते आफ्रिका खंडापर्यंत झालेला आढळतो. भारतात गाय ही
प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ यासाठी संगोपित केली जाते. तसेच
शेतीसाठी उपयुक्त पशुवंश पैदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणात गाई पाळल्या
जातात.
आपल्या देशात गाईला मातेचे स्थान दिले जाते. तिला गो, गौ, गऊ, गोमाला,
धेनू इत्यादी नावाने संबोधले जाते. भारतीय गाईंची चांगली रोगप्रतिकारक
शक्ती व प्रतिकुल हवामानात जगायची क्षमता यामुळे बाहेरच्या देशात या
गाईंना नेऊन संकरित करून किंवा सरळ निवड पद्धतीने उत्तम गोवंश निर्माण
केला जातो.
भारतीय गोवंश - बैल
भारतीय वंशातील एक उपयुक्त पाळीव प्राणी म्हणून बैलास ओळखले जाते.
भारतात अनेत जाती-प्रजातीचे बैल आढळतात.
नागोरी - राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील
ही बैलाची जात शेती कामासाठी सगळ्यात उत्कृष्ट म्हणुन ओळखली जाते.
खिल्लार - महाराष्ट्रातील शेतीसाठी
सर्वात जास्त पाळले जाणारे बैल म्हणून खिल्लार बैलांची ओळख
आहे. विशेषतः शेतकरी लोक आपली संस्कृती व आवड म्हणून बैलगाडा
शर्यतीसाठी या बैलांचे संगोपन करतात.
हल्लीकर - बैलाची ही जात
प्रामुख्याने कर्नाटकमध्ये आढळून येते. या बैलांचा वापर
शेती तसेच शर्यतींसाठी केला जातो.
माळवी व निमाडी हे बैल पंजाब व
हरियाणा या भागात आढळतात. या बैलांबरोबरच महाराष्ट्रात
लाल कंधारी, गौळावू, देवणी, डांगी या सर्वसाधारण जाती
आढळतात.