विधानसभेचे सदस्य असतांना १९८० मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कायम दुष्काळी तालुक्याची परिषद भरवून दुष्काळ हटवण्याची कायम स्वरुपी योजना बनविण्याच्या दृष्टीने विचार विमर्ष सुरू केला होता.
स्वतःला शिरूर तालुक्याचा सालकरी समजणाऱ्या या निर्लोभी वृत्तीच्या कर्मयोग्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचेच स्वप्न सतत पाहिले व त्यासाठी आपला देह झिजवला; खेडेगावातील रस्त्यापासून ते शिक्षणसंस्था दवाखान्यांपर्यंतचे विविध विषय हाताळले. सर्वसामान्यांशी अत्यंत अकृत्रिम स्नेह व जिव्हाळा ही त्यांची विशेषता. त्यांचे स्मरण म्हणून स्व. बाबुराव दौंडकर स्मारक समितीची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली.
सदस्य